विराटकडे गुड न्यूज!
क्रिकेटपटू आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या घरी लवकरच एका नवीन पाहुण्याचे आगमन होणार आहे. विराट आणि अनुष्का या दोघांनीही आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट करत ही माहिती दिली आहे.
"आणि तेव्हा, आम्ही तिघे असू", असं कॅप्शन देत दोघांनीही आपला फोटो शेअर केला आहे. यात त्यांनी अनुष्का शर्मा गरोदर असल्याची बातमी दिली आहे.
२०२१ च्या जानेवारी महिन्यात कोहली कुटुंबात नवीन चिमुकला पाहुणा येणार असे त्यांनी सांगितले आहे.
विराट आणि अनुष्का यांना विरुष्का असं म्हटलं जातं .११ डिसेंबर २०१७ रोजी हे दोघे लग्नबंधनात अडकले होते.
व्यवसाय वाढवायचाय? मग डिजिटल मार्केटिंग केलंच पाहिजे. याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी या लिंकवर क्लिक करा:
https://www.creativekhopadi.com/services