थिएटर तुमच्या खिशात...!
Updated: Aug 21, 2020
"कभी कभी लगता है आपुन ही भगवान है" म्हणणाऱ्या गणेश गायतोंडेशी कशी ओळख झाली? कॉलेजच्या मुलांना आयएएस बनण्याची प्रेरणा देणारा मुन्ना भैया कुठे भेटला? त्याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत.
कोरोना विषाणूच्या प्रभावामुळे बरीच सार्वजनिक ठिकाणे बंद आहेत. मनोरंजनाचे महत्वाचे आणि सगळ्यांच्या आवडीचे साधन म्हणजे चित्रपटगृह. पण तीही सध्या बंद आहेत. त्यामुळे लोकांच्या मनोरंजनाचं एक माध्यम बंद झालं. अशातच प्रेक्षकांना आधार आहे तो म्हणजे ओटीटी प्लॅटफॉर्म्सचा!
कदाचित बऱ्याच जणांना हे माहीत नसेल की ओटीटी प्लॅटफॉर्म कशाला म्हणतात? आपल्यापैकी बरेच जण नेटफ्लिक्स, ऍमेझॉन प्राइम, एमएक्स प्लेयर, डिस्नी हॉटस्टार यावर वेगवेगळ्या वेबसिरीज बघत असतील. या प्लॅटफॉर्म्सला ओटीटी म्हणजे ओव्हर द टॉप प्लॅटफॉर्म म्हणतात. या ओटीटी प्लॅटफॉर्म्सनी जगभरातील प्रेक्षकांच्या मनाचा खूप कमी वेळात ताबा घेतला. दर्जेदार आणि खिळवून ठेवणाऱ्या कथा, अभिनेत्यांच्या उत्कृष्ट अभिनय आणि लक्षात राहतील असे संवाद यामुळे ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरच्या बऱ्याचश्या वेबसिरीज प्रेक्षकांच्या मनावर कोरल्या गेल्या. या ओटीटी प्लॅटफॉर्म्सचे अजून एक वैशिष्टय म्ह
णजे यावरील सिरीज, चित्रपट आपण कोणत्याही वेळी, कुठेही बसून आपण मोबाईल किंवा लॅपटॉप किंवा आपल्या गेमिंग कंसोलवरही आपण पाहू शकतो. तेही खिशाला परवडेल अशा किमतीत!
सध्या थिएटर बंद असल्याने चित्रपटसुद्धा या ओटीटी प्लॅटफॉर्मसवर रिलीज होत आहेत. नुकताच, विद्या बालनचा शकुंतला देवी, आयुष्यमान खुराना आणि अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला गुलाबो सीताबो हे चित्रपट ऍमेझॉन प्राईमवर रिलीज करण्यात आले आणि त्याला भरघोस प्रतिसादही मिळाला. घराबाहेर न पडता, कुठेही न जाता, आपण जिथे आहोत तिथे चित्रपटगृह आपल्या सोबत येत आहे. लोकांचा सध्याचा प्रतिसाद पाहता भविष्यात ओटीटी प्लॅटफॉर्म्सचीच चलती असणार आहे हे नक्की!
तो तैय्यार हो जाओ , इस नये दौर के लिये!
व्यवसाय वाढवायचाय? मग डिजिटल मार्केटिंग केलंच पाहिजे. याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी या लिंकवर क्लिक करा:
https://www.creativekhopadi.com/services