top of page
Search

ते होते म्हणून........

Updated: Aug 21, 2020

दुबईतून कोझिकोडे इथे येणाऱ्या एअर इंडिया विमानाला नुकताच अपघात झाला. हे विमान कोरोना व्हायरसच्या प्रभावामुळे परदेशात अडकलेल्या नागरिकांना मायदेशी घेऊन येत होते. या अपघातात १८ प्रवाशांचा आणि २ वैमानिकांचा मृत्यू झाला. हा अपघात कसा झाला? वैमानिकांनी प्रवाश्यांना कसे वाचवले? याची संपूर्ण हकीकत या विमानाचे वैमानिक दीपक साठे यांचे भाऊ निलेश साठे यांनी त्यांच्या शब्दात सांगितली.



" विमानाचे लँडिंग गेअर्स काम करत नव्हते. विमानाला पेट घेण्यापासून वाचवण्यासाठी वैमानिकांनी हवेतच तीन फेऱ्या मारल्या आणि विमानातील इंधन संपवले. त्यामुळे अपघात झाल्यावर विमानातून कसलाही धूर येत नव्हता. त्यांनी तिसऱ्या फेरीनंतर इंजिन बंद केले आणि विमान खाली उतरवले. विमानाचे उजवे पाते फुटले. दोन्ही वैमानिकांचा मृत्यू झाला मात्र १५० पेक्षा अधिक प्रवाश्यांचे प्राण वाचले."

भावाच्या मृत्यूमुळे भावनिक होऊन निलेश साठे यांनी दीपक यांच्याबद्दल सांगितले," दीपक अनुभवी वैमानिक होते. त्यांच्याकडे ३६ वर्षांचा अनुभव होता. एअर इंडियासाठी व्यावसायिक वैमानिक म्हणून काम करण्याआधी ते भारतीय हवाई दलात २१ वर्षे कार्यरत होते. परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्याच्या या 'वंदे भारत मिशन'साठी काम करणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे असे त्याला वाटत होते."

" तो हवाई दलात असतानाही एक अपघात झाला होता. या अपघातात त्याच्या डोक्याला बऱ्याच जखमाही झाल्या होत्या. तो सहा महिन्यांपर्यंत दवाखान्यातच होता. या अपघातातून तो वाचू शकेल असे कोणालाही वाटत नव्हते. पण त्याची प्रबळ इच्छाशक्ती आणि कामाबद्दलची आवड यामुळे तो त्या अपघातातून सावरला."


कॅप्टन दीपक साठे आणि फर्स्ट ऑफिसर अखिलेश कुमार हे दोघे वैमानिक या अपघातात मृत्युमुखी पडले. या दोघांनीही आपल्या परीने हा अपघात रोखण्याच्या पूर्ण प्रयत्न केला. या मुळेच दीडशेपेक्षा अधिक प्रवाशांचे प्राण वाचू शकले. पण दुर्दैवाने या अपघातात काही प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला.


या वैमानिकांच्या शौर्याला सलाम आणि मृतांना भावपूर्ण आदरांजली!




व्यवसाय वाढवायचाय? मग डिजिटल मार्केटिंग केलंच पाहिजे. याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी या लिंकवर क्लिक करा:


https://www.creativekhopadi.com/services

26 views0 comments
bottom of page