या ऐतिहासिक सिनेमाच्या शूटिंग चे व्हिडिओ झाले व्हायरल ९ लाख लोकांनी पहिला व्हिडिओ
Updated: Aug 21, 2020
सध्या ऐतिहासिक सिनेमां कडे प्रेक्षांचा बराच कल आहे आणि यातूनच अनेक ऐतिहासिक सिनेमांची निर्मिती सुद्धा होत आहे , अजय देवगण , संजय लीला भन्साली , आशुतोष गोवारीकर यांनी हिंदीमध्ये सिनेमे बनवले अश्याच मोठ्या धाटणीचा चित्रपट मराठी मध्ये बनतोय ज्याचं नाव आहे सरसेनापती हंबीरराव! स्वराज्याचे सरसेनापती आणि संभाजी राजांचे मामा हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची गाथा सांगणारा हा चित्रपट असेल.
सध्या या चित्रपटाचे शूटिंग संगममाहुली सातारा येथे सुरु आहे पण या सेट वर एक अनुचित प्रकार घडला , एका चाहत्याने शूटिंग सुरु असताना चे काही व्हिडिओ काढून ते त्याच्या टिकटॉक अकाउंट वर पोस्ट केले. आणि या व्हिडिओ ला तब्बल नऊ लाख लोकांनी पहिले आणि पसंती दिली.

या वरून प्रक्षकांमध्ये सरसेनापती हंबीरराव या चित्रपटाची असणारी उत्सुकता दिसून येते. मात्र व्हिडिओ ला जरी इतक्या लोकांनी पहिला असेल तरी चित्रपटाचे निर्माते संदीप मोहिते पाटील , धर्मेंद्र बोरा आणि सौजन्य निकम यांनी मात्र थोडी नाराजी व्यक्त केली, त्यांच्या मते अश्या प्रकारे व्हिडिओ शूट करू नये आम्ही तुमच्यासाठीच चित्रपट बनवत आहोत तो एडिट झाल्यांनतर बघण्यात जास्त मजा आहे , आमची सर्व प्रेक्षकांना विनंती आहे कि कृपया असे व्हिडिओ शेयर करू नका असेही ते पुढे म्हणाले.
याबाबत संदीप मोहिते पाटील असेही म्हणाले कि पायरसी हि चित्रपट सृष्टीला लागलेली कीड आहे ती रोखने गरजेचे आहे आणि त्यामुळे माझी प्रेक्षकांना हि देखील विनंती आहे कि असे मोठ्या खर्चाने बनवलेले चित्रपट तुम्ही थियेटर मध्ये जाऊन बघा,जेणेकरून प्रोड्युसर्स ना प्रोत्साहन मिळत राहील

दरम्यान प्रवीण तरडे लिखित आणि दिगदर्शित आणि उर्विता प्रोडक्शन निर्मित हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. असे म्हणले जाते कि मराठी मधला हा सर्वात बिग बजेट चित्रपट आहे.
व्यवसाय वाढवायचाय? मग डिजिटल मार्केटिंग केलंच पाहिजे. याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी या लिंकवर क्लिक करा:
https://www.creativekhopadi.com/services