संजय दत्तची नवी लढाई
Updated: Aug 21, 2020
बॉलिवूडमधील एक दुःखद वृत्त आता समोर येत आहेत. अभिनेता संजय दत्त याला कर्करोग झाल्याचे समोर आले आहे
काही दिवसांपूर्वी अभिनेता संजय दत्त याला श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तब्येत ठीक नसल्याचे सांगत त्याने आपण काही दिवस कामातून ब्रेक घेत असल्याचे ट्विट केले होते.
पण आता संजय दत्त याला तिसऱ्या स्टेजचा कर्करोग असल्याचे वृत्त समोर आले आहे. कोमल नाहता यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरून ही माहिती दिली आहे. तसेच त्याने या आजारातून लवकर बरे व्हावे अशी प्रार्थना करण्याचे आवाहनही केले आहे.
संजय दत्तला श्वसनाचा त्रास होत असल्याने त्याची कोविड टेस्टदेखील करण्यात आली. परंतु, ही टेस्ट निगेटिव्ह आली. परंतु, त्याला फुफ्फुसाचा तिसऱ्या स्टेजचा कर्करोग झाल्याचे निदान झाले आहे. त्याचे चाहते तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत. आम्ही तुमच्यासोबत आहोत अशा आशयाच्या अनेक कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
व्यवसाय वाढवायचाय? मग डिजिटल मार्केटिंग केलंच पाहिजे. याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी या लिंकवर क्लिक करा:
https://www.creativekhopadi.com/services