सख्त लौंडा इज बॅक!
झाकीर खान हा भारतातील प्रसिद्ध स्टॅन्ड अप कॉमेडियनपैकी एक आहे. अल्पावधीतच त्याच्या शैलीमुळे तो बराच लोकप्रिय झाला. त्याच्या फॉलोवर्स, सब्स्क्राइबर्समध्ये झपाट्याने वाढ झाली.
नुकतंच त्याने आपल्या सोशल मीडिया अकॉउंटवरून तो ऍमेझॉन प्राईमसोबत चार नवीन शोज घेऊन येणार असल्याचे जाहीर केले आहे. 'चाचा विधायक है हमारे' या वेबसिरींजचा दुसरा सीजन लवकरच येणार आहे तर बाकीच्या तीन ह्या स्टॅन्ड अप कॉमेडी विशेष असणार आहेत. त्यापैकी एकाचे शीर्षक 'तथास्तु' असे आहे तर इतर दोघांची नावे अजून जाहीर नाहीत.
अजून यापैकी कोणत्याही शोची रिलीज डेट कळली नाही पण 'चाचा विधायक है हमारे' हा सीजन आधी येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
याआधी 'चाचा विधायक है हमारे' या सिरीजचा पहिला सीजन बराच हिट ठरला. नामसाधर्म्य असल्याने राजकीय नेत्याशी नाते सांगणाऱ्या एका बेरोजगार तरुणाची ही कथा आहे. 'कक्षा ग्यारहवी', 'हक से सिंगल', 'ह्युमरसली यूअर्स', 'भाई तुम्हारा सुपरमॅन' असे त्याचे शोज प्रेक्षकांच्या भरपूर पसंतीस उतरले आहेत. आता त्याच्या पुढील शोजसाठी प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत आणि प्रतीक्षा करत आहेत.
व्यवसाय वाढवायचाय? मग डिजिटल मार्केटिंग केलंच पाहिजे. याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी या लिंकवर क्लिक करा:
https://www.creativekhopadi.com/services