Search

सैफ अली खान रावण?

ओम राऊत याचे दिग्दर्शन असलेला 'आदिपुरुष' हा नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटामध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास हा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात दिसणाऱ्या इतर कलाकारांबद्दल कोणताही उल्लेख करण्यात आला नव्हता. पण आता या चित्रपटात बॉलिवूडचा अजून एक मोठा अभिनेता दिसणार असल्याचे वृत्त आहे. कोण आहे तो अभिनेता? चला पाहूया!'आदिपुरुष' या आगामी चित्रपटात 'लंकेश' या भूमिकेत अभिनेता सैफ अली खान दिसणार आहे. हा चित्रपट रामायणावर आधारित असल्याची चर्चा आहे. याविषयी अद्याप खुलासा झालेला नाही. पण सैफ अली खान याची भूमिका लंकेश अर्थात रावण अशी असल्याचे नुकतेच जाहीर करण्यात आले आहे.यापूर्वी सैफ अली खान याने तान्हाजी द अनसंग वॉरिअर या चित्रपट राजपूत सरदार उदयभान याची खलनायकी भूमिका साकारली होती.त्याची ही आगामी भूमिकाही अशाच प्रकारची खलनायकी असणार आहे. या चित्रपटाबद्दल तसेच सैफ अली खानच्या भूमिकेबद्दल चित्रपट रसिक तसेच चाहत्यांमध्ये उत्सुकतेचे वातावरण आहे.

आदिपुरुष हा चित्रपट हिंदी, तेलगू, तामिळ, कन्नड, मल्याळम या ५ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग २०२१ पासून सुरु होईल तर २०२२ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.


व्यवसाय वाढवायचाय? मग डिजिटल मार्केटिंग केलंच पाहिजे. याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी या लिंकवर क्लिक करा:


https://www.creativekhopadi.com/services

21 views0 comments