top of page
Search

सैफ अली खानचे आत्मचरित्र लवकरच!

अभिनेता सैफ अली खानने आपल्या निराळ्या अंदाजाने आणि अभिनयाने सैफने स्वत:चा वेगळा चाहतावर्ग निर्माण केला. आता सैफने आत्मचरित्र लिहिण्याचा निर्णय घेतला आहे. या आत्मचरित्रात त्याचा चित्रपटसृष्टीतील प्रवास, खासगी जीवन, यशापयश आणि जीवनाशी निगडीत इतर महत्त्वपूर्ण गोष्टींवर प्रकाश टाकला जाईल. त्याचं हे आत्मचरित्र पुढच्या वर्षी प्रकाशित करण्यात येईल.
याविषयी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत सैफ म्हणाला, “अशा अनेक गोष्टी आहेत ज्या बदलल्या आहेत आणि त्यांचं जतन करून न ठेवल्यास बदलत्या वेळेनुसार त्या हरवतील. एकदा मागे वळून त्या सर्व गोष्टी साठवून घेणं चांगलंच आहे. हा एका प्रकारे स्वार्थी प्रवास आहे पण मला यावर पूर्ण विश्वास आहे की लोकांना हे पुस्तक नक्कीच आवडेल.”सैफच्या आत्मचरित्राचं नाव काय असेल हे मात्र अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र सोशल मीडियावर त्यावरून जोरदार चर्चेला सुरुवात झाली आहे.अभिनेत्री करीना कपूरशी सैफ अली खान याने दुसरा विवाह केला आहे. त्यामुळे तेव्हापासूनच तो विशेष चर्चेत आहे. करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांचा मुलगा तैमूर हाही प्रसिद्धीच्या झोतात आहे.व्यवसाय वाढवायचाय? मग डिजिटल मार्केटिंग केलंच पाहिजे. याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी या लिंकवर क्लिक करा:


https://www.creativekhopadi.com/services

15 views0 comments
bottom of page