सडकवर भडकली पब्लिक!
Updated: Aug 21, 2020
संजय दत्त, पूजा भट्ट, सदाशिव अमरापूरकर यांची प्रमुख भूमिका असलेला सडक हा चित्रपट १९९१ साली प्रदर्शित झाला. त्याकाळी या चित्रपटाने ११७ कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाचा सिक्वेल 'सडक २' येत्या २८ तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
आजच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. महेश भट्ट यांनी ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. डिस्ने हॉटस्टार या प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. संजय दत्त, पूजा भट्ट, आलिया भट्ट, आदित्य रॉय कपूर, मकरंद देशपांडे हे या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत.
मात्र या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून काही तासातच या व्हिडिओला जवळपास एक मिलियन लोकांनी डिसलाईक केले आहे. तसेच ट्विटरवर '#बॉयकॉटसडक२' हा हॅशटॅग मोठ्या प्रमाणावर ट्रेंडिंग होत आहे. सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्येमुळे महेश भट्ट यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. तसेच घराणेशाहीवरही मोठ्या प्रमाणावर टीका केली जात आहे. '#sushantwasmurdered' हा हॅशटॅगही ट्विटरवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
आज सकाळीच संजय दत्तला फुफ्फुसांचा तिसऱ्या स्टेजचा कॅन्सर असल्याची बातमी समोर आली आहे. त्यानंतर काही वेळातच 'सडक२' चा ट्रेलर प्रदर्शित झाला. त्यामुळे हा पब्लिसिटी स्टंट असल्याची चर्चाही नेटकऱ्यांमध्ये सुरु असल्याचे दिसून येते.
व्यवसाय वाढवायचाय? मग डिजिटल मार्केटिंग केलंच पाहिजे. याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी या लिंकवर क्लिक करा:
https://www.creativekhopadi.com/services