top of page
Search

प्रेमाचा नियम की नियमांतील प्रेम?

निसर्ग आणि प्रेम या दोन गोष्टी अशा आहेत की ज्यांना कधीच कायद्याच्या चौकटीत बांधता येणार नाही. पण हे प्रेम जर कायद्यात अडकवण्याचा प्रयत्न केला तर काय होईल?यावर दृष्टीक्षेप टाकणारा लॉ ऑफ लव्ह हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

नेहमीच प्रेक्षकांची पसंती मिळालेला हा विषय नव्याने मोठ्या पडद्यावर पाहणं सगळ्यांसाठी उत्तम पर्वणी ठरणार आहे. वेदिका फिल्म्स क्रिएशन निर्मित लॉ ऑफ लव्ह हा सिनेमा सिनेमागृहात येण्यासाठी सज्ज झाला आहे. कोणतेही नियम आणि बंधनं नसणारं प्रेम समाजमान्य किती असतं याबाबत शंकाच आहे. आजही प्रेमाचा प्रवास खडतर वाटांनी भरला आहे. असाच काहीसा प्रवास लॉ ऑफ लव्ह सिनेमाच्या कथेतून मांडण्यात आला आहे.



आदित्य आणि साक्षी यांची ही हटके लव्ह स्टोरी अनेकांच्या मनाचा ठाव घेईल. लॉ ऑफ लव्ह सिनेमाच्या माध्यमातून जे. उदय आणि शाल्वी शाह यांची नवी कोरी जोडी या सिनेमाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर सिनेमात अभिनेता मोहन जोशी, यतीन कार्येकर,अनिल नगरकर आणि प्राची पालवे यांच्या देखील प्रमुख भूमिका आहेत. सिनेमाची कथा, पटकथा आणि निर्मिती जे. उदय यांची आहे.



सिनेमातील संवाद जे उदय आणि मकरंद लिंगनूरकर यांनी लिहिले आहेत. दिग्दर्शन सी.एस. निकम यांनी केलं आहे. संगीतकार पी. शंकरम यांनी सिनेमाला संगीत दिले असून मुराद तांबोळी, पी. शंकरम आणि निलेश कोटके हे गीतकार आहेत. पी. शंकरम, मुग्धा इनामदार आणि राधिका अत्रे यांनी सिनेमातील गाणी स्वरबद्ध केली आहेत. प्रेमाच्या एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जाणारी आणि मंत्रमुग्ध करणारी गाणी सिनेमाची जान आहेत.

धडाकेबाज ऍक्शन आणि डायलॉगची तुफान फटकेबाजी सिनेमाला एका वेगळ्याच उंचीवर नेणारी आहे.

मुंबई, कुडाळ आणि कोल्हापूरच्या नयनरम्य ठिकाणी चित्रित झालेला हा सिनेमा प्रेक्षकांना अनोखा अनुभव देईल. सिनेमाचे छायांकन मंजुनाथ नायक, संकलन मनीष शिर्के, कला सतीश बिडकर, नृत्य ताज खान, ऍक्शन देव राज, ध्वनी संरचना दिनेश उच्चील आणि शांतनु आकेरकरयांनी केली आहे. मनोरंजनात तसेच जगण्यातील तोच तोचपणा बाजूला सारत रिफ्रेश करणारा लॉ ऑफ लव्ह सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात लवकरच प्रदर्शित होणार आहे.




व्यवसाय वाढवायचाय? मग डिजिटल मार्केटिंग केलंच पाहिजे. याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी या लिंकवर क्लिक करा:


https://www.creativekhopadi.com/services



34 views0 comments
bottom of page