top of page
Search

ओ स्त्री जपान आना!

‘स्त्री’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. श्रद्धा कपूर, राजकुमार राव, अपारशक्ती यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून तो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. विशेष म्हणजे आता हा चित्रपट जपानच्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे.



श्रद्धा कपूरने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे. ‘स्त्री सगळ्यावर विजय मिळवण्यासाठी सज्ज. आज जपानमध्ये प्रदर्शित होणार’, असं कॅप्शन श्रद्धाने या पोस्टला दिल्याचं पाहायला मिळालं.




त्यामुळे हा चित्रपट आता जपानमध्ये प्रदर्शित झाल्याचं पाहायला मिळालं.



दरम्यान, ‘स्त्री’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला होता. स्त्रीमुळे श्रद्धाच्या लोकप्रियतेत तुफान वाढ झाली आहे. यापूर्वी श्रद्धा ‘आशिकी २’, ‘एक व्हिलन’, ‘हैदर’, ‘बागी’, ‘रॉक ऑन २’, ‘हसीना पारकर’, ‘ओके जानू’, ‘हाफ गर्लफ्रेंड’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

2 views0 comments
bottom of page