नेटफ्लिक्सचा क्लास भरतोय !
Updated: Aug 21, 2020
सॅक्रेड गेम्स, बुलबुल, दिल्ली क्राइम, लस्ट स्टोरीज अशा अनेक प्रसिद्ध वेबसीरिजच्या भरघोस यशानंतर नेटफ्लिक्स लवकरच एक नवीन ड्रामा फिल्म घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ही फिल्म म्हणजे रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि नेटफ्लिक्सची 'क्लास ऑफ 83'. २१ ऑगस्टला ही फिल्म नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे.
गौरी खान आणि शाहरुख खान यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात बॉबी देओल, अनुप सोनी, जॉय सेनगुप्ता , विश्वजित प्रधान, भूपेंद्र जडावत हे प्रमुख भूमिकेत असणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
ही फिल्म प्रसिद्ध लेखक आणि शोधपत्रकार हुसेन झैदी यांच्या 'क्लास ऑफ 83' या पुस्तकावर आधारित आहे. ही फिल्म एका पोलीस अधिकाऱ्याची कथा आहे ज्याला शिक्षा म्हणून पोलीस प्रशिक्षण केंद्राचा अधिकारी म्हणून नेमण्यात येते. हा पोलीस अधिकारी आपल्या हाताखाली इतर पोलिसांना प्रशिक्षण देतो आणि भ्रष्टाचार, गुन्हेगारी संपवण्याचा प्रयत्न करतो. अशा आशयाची ही कथा आहे. सस्पेन्स, ऍक्शन अशी ही फिल्म प्रेक्षकांच्या पसंतीस नक्कीच उतरेल असं यांच्या ट्रेलरवरून वाटत आहे. बघुयात आता २१ ऑगस्टला भरणारा हा नेटफ्लिक्सचा क्लास प्रेक्षकांचे कितपत मनोरंजन करतो!
व्यवसाय वाढवायचाय? मग डिजिटल मार्केटिंग केलंच पाहिजे. याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी या लिंकवर क्लिक करा:
https://www.creativekhopadi.com/services