मुन्ना भैया, गुड्डू, कालीन भैय्या सब आ रहे हैं !
Updated: Aug 21, 2020
मिर्झापूरच्या २०१८ साली प्रसिद्ध झालेल्या पहिल्या सीझनचा हँग ओव्हर अजूनही प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे. मीमर्ससाठी तर ही वेबसिरीज म्हणजे खाद्यच ठरली. त्या सर्वांसाठी आणि मिर्झापूरच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच या वेब सिरीजचा दुसरा सिझन येत आहे.
या वेब सीरिजच्या पहिल्या सीझनमधील मुन्ना भैय्या, गुड्डू ही पात्रे लोकांच्या पसंतीस उतरली. आजही त्यांची जादू प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे. या वेब सिरीजमधील बरेच संवाद नेटकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात वापरले गेले. प्रेक्षक, समीक्षक सर्वांच्याच पसंतीस उतरलेलया या वेब सिरीजच्या दुसऱ्या सिझनची सर्वचजण उत्सुकतेने प्रतीक्षा करत होते. अखेरीस लवकरच हा सिजन प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याची माहिती या सीरिजच्या टीमने दिली आहे. या सिझनची डबिंग तसेच एडिटिंग आणि इतर तांत्रिक कामे पूर्णत्त्वाला आली असून लवकरच ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मागील सीझनप्रमाणेच याही सीझनमध्ये दिव्येंदु शर्मा, पंकज त्रिपाठी, रसिका दुग्गल, श्वेता त्रिपाठी, अली फझल अशी लोकप्रिय स्टारकास्ट यात असणार आहे.
या वेब सीरिजच्या रिलीजची तारीख मात्र अद्याप जाहीर झालेली नाही. पण या वर्षी ही वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे मात्र नक्की!
त्यामुळे थोडी वाट पाहावी लागेल.
चच्चा, जरा सब्र करो!
सब्र का फल मीठा जरूर होगा!
व्यवसाय वाढवायचाय? मग डिजिटल मार्केटिंग केलंच पाहिजे. याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी या लिंकवर क्लिक करा:
https://www.creativekhopadi.com/services