मसाबा मसाबा इज ऑन द वे!
प्रसिद्ध फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता हिच्या आयुष्याची कहाणी सांगणारा एक नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. मसाबा मसाबा हा चित्रपट उद्या म्हणजे २८ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
मसाबा ही प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता यांची मुलगी आहे. तसेच ती भारतातील प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. 'हाऊस ऑफ मसाबा' ह्या प्रसिद्ध ब्रॅण्डची ती निर्माती आहे.
मसाबाचा लहानपणापासूनचा प्रवास, त्यात येणारे चढउतार, त्यातून मार्ग काढत तिने तिच्या क्षेत्रात मिळवलेलं यश याबद्दलची ही कहाणी आहे. या चित्रपटात तिची भूमिका ती स्वतःच करत आहे. तर तिच्या ऑन स्क्रिन आईची भूमिका तिची आई नीना गुप्ता स्वतः करत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर नेटफ्लिक्सकडून रिलीज करण्यात आला आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन सोनम नायर हिने केले आहे तर या चित्रपटाची निर्मिती विनियार्ड फिल्म्सच्या अश्विनी यार्दी यांची आहे.
नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट २८ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे. याचा ट्रेलर बघून चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. मसाबा गुप्ता हिचा अभिनय प्रेक्षकांना आवडला आहे,असे ट्रेलरवरच्या कॉमेंट्समधून दिसून येत आहे. पाहुयात आता या चित्रपटाला प्रेक्षकांची किती पसंती मिळते आहे!
व्यवसाय वाढवायचाय? मग डिजिटल मार्केटिंग केलंच पाहिजे. याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी या लिंकवर क्लिक करा:
https://www.creativekhopadi.com/services