मराठीतील गुणी अभिनेत्रीचा यशस्वी प्रवास
Updated: Aug 21, 2020
आज आपण मराठीतील एका प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत. अभिनय असो वा नृत्य अथवा गायन, सर्वच क्षेत्रात पारंगत असलेली अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिची आजपर्यंतची कारकीर्द, अभिनय क्षेत्रातील प्रवास आपण जाणून घेणार आहोत.
मूळची पुण्याची असलेली मृण्मयी लहानपणापासून कथ्थकचे प्रशिक्षण घेत होती. सातवीपासून तिने अभिनयाला सुरुवात केली. शाळा-कॉलेजमध्ये असताना तिने अनेक एकांकिकांमध्ये भाग घेतला होता. कॉलेजमध्ये असताना तिने एका एकांकिकेचे दिग्दर्शनही केले होते आणि त्यासाठी तिला उत्कृष्ट दिग्दर्शनाचे पारितोषिकही मिळाले होते.
२००८ साली प्रदर्शित झालेल्या 'हमने जिना सिख लिया' या हिंदी चित्रपटातून तिने मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. या चित्रपटानंतर तिने वेगवेगळ्या मराठी मालिकांमधूनही काम करायला सुरुवात केली. अग्निहोत्र, कुंकू ह्या तिच्या मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरल्या. 'कुंकू'मधील जानकीने तिला प्रसिद्धी मिळवून दिली.
यानंतर तिने मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. एक कप चाय, पुणे व्हाया बिहार, मोकळा श्वास, धामधूम, आंधळी कोशिंबीर हे तिचे काही प्रमुख चित्रपट. फर्जंद, फत्तेशिकस्त ह्या ऐतिहासिक चित्रपटात तिने आपल्या अभिनयाची वेगळी छटा दाखवून दिली. "शिकारी". शिकारी या चित्रपटामधून तिने बिनधास्त अंदाज प्रेक्षकांसमोर मांडला. या चित्रपटाची चांगलीच चर्चा झाली.
'मन फकिरा' या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन मृण्मयीने केले आहे. सध्या मृण्मयी देशपांडे ही अनेक चित्रपटांमध्ये आणि नाटकांमध्ये काम करताना आपल्याला दिसून येत आहे. मृण्मयीच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
व्यवसाय वाढवायचाय? मग डिजिटल मार्केटिंग केलंच पाहिजे. याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी या लिंकवर क्लिक करा:
https://www.creativekhopadi.com/services