मराठी 'क्षितिज' आता हिंदीतही विस्तारतंय ...!
Updated: Aug 21, 2020
वायझेड, टाईमपास २, धुरळा, फास्टर फेणे, क्लासमेट्स, डबल सीट अशा सुपरहिट चित्रपटांचे लेखक तसेच सातारचा सलमान, बापजन्म अशा प्रसिद्ध मराठी चित्रपटाचे गीतकार क्षितिज पटवर्धन आता हिंदीतही आपली ओळख निर्माण करत आहेत.
आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करत त्यांनी याबद्दल माहिती दिली आहे. " आजपर्यंत मी अमित त्रिवेदीचा खूप मोठा फॅन होतो, पुढेही असेनच, पण आज सांगायला अभिमान वाटतो की आता मी त्याचा गीतकार सुद्धा आहे. गीतकार म्हणून पहिला हिंदी सिनेमा! झी स्टुडिओ ची निर्मिती, भारतातील अव्वल नृत्य दिग्दर्शक बॉस्को मार्टीस याचं धडाकेबाज दिग्दर्शन पदार्पण आणि अमित त्रिवेदी यांचं संगीत. अजून काय हवं? आजच डबल सीट ला पाच वर्ष झाली, आणि स्वप्न पहायची गम्मत पुन्हा एकदा प्रत्यक्षात आली", या कॅप्शनसह त्यांनी या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे.
'रॉकेट गॅंग' हा झी स्टुडिओजची निर्मिती असलेला नवीन चित्रपट २०२१ मध्ये येत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन बॉस्को मार्टीस यांनी केले आहे. अमित त्रिवेदी यांचे संगीत असलेल्या या चित्रपटासाठी गीतकार म्हणून क्षितिज पटवर्धन हे मराठी नाव आता आपल्याला दिसणार आहे. गीतकार म्हणून त्यांचा हा पहिलाच हिंदी चित्रपट आहे.
या आधी त्यांनी बघतोस काय मुजरा कर, बापजन्म, सातारचा सलमान, व्हाट्सअप लग्न, अंड्याचा फंडा या मराठी चित्रपटांसाठी गीतकार म्हणून काम केले आहे आणि मराठी चित्रपटसृष्टीला अनेक हिट गाणी दिली आहेत. आता त्यांची पावले हिंदीकडे वळत आहेत. हिंदी चित्रपटातही त्यांची कारकीर्द यशस्वीच असेल ही सदिच्छा! क्षितिज पटवर्धन यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !
व्यवसाय वाढवायचाय? मग डिजिटल मार्केटिंग केलंच पाहिजे. याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी या लिंकवर क्लिक करा:
https://www.creativekhopadi.com/services