top of page
Search

लाईट्स, कॅमेरा, मास्क ऑन ..... ऍक्शन!


अक्षय कुमारचा एक नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे नाव आहे बेलबॉटम! तरन आदर्श यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून याबाबत माहिती दिली आहे. अक्षय कुमारनेही आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक विडिओ शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे.


आजपासून या चित्रपटाचे शूटिंग सुरु होत आहे.

या चित्रपटात वाणी कपूर, हुमा कुरेशी तसेच लारा दत्ता हे कलाकार दिसणार आहेत. तर अक्षय कुमार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रणजित तिवारी करत आहेत. वासू भगनानी, जॅकी भगनानी आणि दीपशिखा देशमुख हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. या चित्रपटाच्या शूटिंगचा मुहूर्त वासू भगनानी यांच्या पत्नी पूजा भगनानी यांच्या हस्ते करण्यात आला.अक्षय कुमारच्या या नवीन चित्रपटाबद्दल त्याचे चाहते उत्सुक आहेत. अनेकांनी याबद्दल कॉमेंट्ससुद्धा केल्या आहेत. हा चित्रपट २ एप्रिल २०२१ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
व्यवसाय वाढवायचाय? मग डिजिटल मार्केटिंग केलंच पाहिजे. याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी या लिंकवर क्लिक करा:


https://www.creativekhopadi.com/services


19 views0 comments
bottom of page