top of page
Search

खिलाडी का नया खेल .......!



बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार उत्साह, धाडस, फिटनेस यासाठी प्रसिद्ध आहे. त्याचे स्टंट्सही तो स्वतःच करतो. तसेच त्याचा फिटनेससुद्धा सर्वानी आदर्श घेण्यासारखा आहे.



अक्षयकुमारने अनेक ऍक्शन चित्रपट केले, विनोदी चित्रपट केले. त्यासोबतच त्याने खतरो के खिलाडी हा रिऍलीटी शोसुद्धा केला. आता हा खिलाडी कुमार आपल्या नव्या भूमिकेत दिसणार आहे.



डिस्कव्हरी वाहिनीवरील बेअर ग्रिल्सच्या इनटू द वाइल्ड या कार्यक्रमात अक्षय कुमार लवकरच दिसणार आहे. अक्षयकुमारने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करून ही माहिती दिली आहे. अक्षय हा या शोमध्ये सहभागी होणारा तिसरा भारतीय असणार आहे.



यापूर्वी सुपरस्टार रजनीकांत, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या कार्यक्रमात सहभागी झाले होते. अक्षय कुमारसोबत चित्रित झालेला हा भाग प्रदर्शित कधी होईल याबाबत अद्याप काही कळले नाही. पण लवकरच हा भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे.



व्यवसाय वाढवायचाय? मग डिजिटल मार्केटिंग केलंच पाहिजे. याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी या लिंकवर क्लिक करा:


https://www.creativekhopadi.com/services


41 views0 comments
bottom of page