खाली पिली आ रेला है ...
धडक चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला ईशान खट्टर आणि स्टुडन्ट ऑफ द इयर २ आणि पती, पत्नी और वो या चित्रपटांतून अभिनयाची चुणूक दाखवलेली अनन्या पांडे यांचा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कोणता आहे हा चित्रपट? चला पाहूया!
'खाली पिली' या नवीन चित्रपटातून अनन्या पांडे आणि ईशान खट्टर आपल्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट येत्या २ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
'झी प्लेक्स' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे. एक लडका, एक लडकी और एक मॅड राईड दाखवणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल हे लवकरच पाहायला मिळणार आहे.
या चित्रपटाची निर्मिती हिमांशू किशन मेहरा, अली अब्बास जाफर तसेच झी स्टुडिओस यांनी केली आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन मकबूल खान यांचे आहे.
व्यवसाय वाढवायचाय? मग डिजिटल मार्केटिंग केलंच पाहिजे. याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी या लिंकवर क्लिक करा:
https://www.creativekhopadi.com/services