Search
  • editor creativekhopadi

कारगिल गर्लला भेटलात?

Updated: Aug 21, 2020कारगिलचे ऐतिहासिक युद्ध! अतिउंचीवर लढले गेलेल्या या ऐतिहासिक युद्धाची शौर्यगाथा आजही भारतीयांच्या मनात कायम आहे. या युद्धात सहभागी झालेली पहिली भारतीय लढाऊ वैमानिक गुंजन सक्सेनाच्या शौर्याची कहाणी आज नेटफ्लिक्सच्या माध्यमातून समोर येत आहे.


पुरुषांचे वर्चस्व असणाऱ्या क्षेत्रात एक स्त्री आपल्या धैर्य ,शौर्य आणि हुशारीच्या जोरावर टिकून राहते. आपल्या शौर्याने आपली जागा देशाच्या इतिहासात अजरामर करते. या स्त्रीच्या शौर्याची, पराक्रमाची ही कहाणी नेटफ्लिक्सच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. जान्हवी कपूर, पंकज त्रिपाठी, अंगद बेदी हे या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसत आहेत. 'दंगल' चित्रपटाचे लेखक निखिल मेहरोत्रा यांनी या चित्रपटाचे लेखन केले आहे तर शरण शर्मा याने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. शरणचा हा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट आहे.
फ्लाईट लेफ्टनंट गुंजन सक्सेनांच्या आयुष्यातील साधारण १५ वर्षांचा कालखंड या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. या १५ वर्षात त्यांच्या आयुष्यात आलेले चढ उतार, त्यावर मात करून त्यांनी गाजवलेले शौर्य, धाडस आणि हिमतीने केलेला पराक्रम हा चित्रपट आपल्याला सांगतो.गुंजन सक्सेनाची ही कहाणी समीक्षकांच्याही पसंतीस उतरली आहे. साधारण साडेतीन स्टार्स या चित्रपटाला समीक्षकांनी दिलेले आहेत. आता पाहूया, हा चित्रपट प्रेक्षकांच्या किती पसंतीस उतरतो?


कारगिलच्या ऐतिहासिक युद्धातील या कारगिल गर्लला भेटायला पाहिजेच!


व्यवसाय वाढवायचाय? मग डिजिटल मार्केटिंग केलंच पाहिजे. याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी या लिंकवर क्लिक करा:


https://www.creativekhopadi.com/services

20 views0 comments