top of page
Search

जॉनचा नवीन लुक व्हायरल!

बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमने 'सत्यमेव जयते या चित्रपटाच्या सिक्वेलचे पोस्टर शेअर केले आहे. त्याची शरीरयष्टी पाहून चाहते त्याच्यावर फिदा आहेत. आधीच्या चित्रपटाप्रमाणे सिक्वेलमध्येही देशभक्तीवर आधारित कथा असल्याचं पोस्टवरुन स्पष्ट दिसत आहे.



जॉन अब्राहमने सोशल मीडियावर चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. पोस्टरवर चित्रपटाची कथा थोडक्यात सांगणारा “जिस देश की मैय्या गंगा है, वहाँ खून भी तिरंगा है” हा डायलॉग देण्यात आला आहे.



जून महिन्यात चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली होती. जॉनने पोस्टर शेअर करताना चित्रपट पुढील वर्षी ईदला १२ मे २०२१ ला रिलीज होणार असल्याची माहिती दिली आहे.मिलाप झवेरी यांचे लेखन आणि दिग्दर्शन आहे. या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात जॉनसोबत मनोज वाजपेयी, अमृता खानविलकर हे कलाकार दिसणार आहेत.








व्यवसाय वाढवायचाय? मग डिजिटल मार्केटिंग केलंच पाहिजे. याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी या लिंकवर क्लिक करा:


https://www.creativekhopadi.com/services

35 views0 comments
bottom of page