गुंजन सक्सेना पहिल्याच दिवशी वादात
Updated: Aug 21, 2020
नेटफ्लिक्सचा 'गुंजन सक्सेना-कारगिल गर्ल' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित करण्यात आला. कारगिल युद्धात अभिमानास्पद कामगिरी बजावणाऱ्या फ्लाईट लेफ्टनंट गुंजन सक्सेना यांच्या आयुष्यावर चित्रित करण्यात आला आहे. पण या चित्रपटातील काही दृश्यांवर भारतीय हवाई दलाने आक्षेप घेतला आहे. हवाई दलाने सेन्सर बोर्ड, नेटफ्लिक्स आणि धर्मा प्रोडक्शन्सला पाठवलेल्या पत्रात याबद्दल सांगितले आहे. या चित्रपटातील काही दृश्ये आणि संवाद असे आहेत ज्यामुळे हवाई दलाची नकारात्मक प्रतिमा तयार होत आहे, असे मत हवाई दलाने या पत्राद्वारे व्यक्त केले आहे.
पहिल्या भारतीय लढाऊ वैमानिक गुंजन सक्सेना यांच्या आयुष्यावर हा चित्रपट बनवण्यात आला आहे. यातील काही दृश्ये अशी आहेत ज्यातून हवाई दलाबद्दल नकारात्मकता निर्माण होत आहे. गुंजन सक्सेना यांचे महत्त्व वाढवण्यासाठी हवाई दलाची प्रतिमा चुकीची दाखवण्यात आली आहे. कामाची पद्धत आणि महिलांना दिली जाणारी वागणूक याबद्दल समाजात चुकीची प्रतिमा निर्माण होऊ शकते, असे हवाई दलाने पाठवलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
१२ ऑगस्ट २०२० रोजी हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला. जान्हवी कपूर ही फ्लाईट लेफ्टनंट गुंजन सक्सेना यांच्या प्रमुख भूमिकेत आहे. अंगद बेदी, पंकज त्रिपाठी, मानव विज हे कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत.
व्यवसाय वाढवायचाय? मग डिजिटल मार्केटिंग केलंच पाहिजे. याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी या लिंकवर क्लिक करा:
https://www.creativekhopadi.com/services