गुगलकडून शुभेच्छा
Updated: Aug 21, 2020
आज भारताचा ७४वा स्वातंत्रदिन. या निमित्त जगभराला भारताची परंपरा आणि संस्कृतीची माहिती देणारं डूडल आज गूगलकडून बनवण्यात आलं आहे. देशाच्या लोककलेविषयी, पारंपरिक वाद्यांविषयी यातून माहिती मिळत आहे.
आजचं हे डूडल बनवलं आहे मुंबईच्या सचिन घाणेकर यांनी! या डूडलमध्ये तुतारी, शहनाई, सारंगी, ढोल, बासरी ही भारतातील पारंपरिक वाद्ये दिसत आहेत. यातून भारताची सांगीतिक परंपरा जगासमोर येत आहे. तालवाद्ये, तंतुवाद्ये असे वाद्यांचे प्रकार या डूडलमधून दाखवण्यात आले आहेत. भारताच्या परंपरेतील आणि संस्कृतीतील ही विविधता एकत्रितपणे भारताच्या संस्कृतीचे दर्शन घडवते.
आज भारताचा ७४वा स्वातंत्र्यदिन. १९४७ साली आजच्याच दिवशी भारत देश स्वतंत्र, सार्वभौम झालं. भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. यानिमित्त सर्व देशवासियांना स्वातंत्रदिनाच्या शुभेच्छा!
व्यवसाय वाढवायचाय? मग डिजिटल मार्केटिंग केलंच पाहिजे. याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी या लिंकवर क्लिक करा:
https://www.creativekhopadi.com/services