Search

इकोफ्रेंडली बाप्पाला अक्षय बर्दापूरकरांचं साकडं


प्रत्येक सणउत्सवाच्या वेळी सामान्यांमध्ये एक कुतूहल असते. ते म्हणजे, हे आपले पारंपरिक सणवार कलाकार मंडळी कशा प्रकारे साजरे करतात. परंपरा आणि संस्कृतीचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या महाराष्ट्रात गणेशोत्सवाचं महत्त्व अनन्य साधारण आहे.या उत्सवाची आपण सगळेच आतुरतेने वाट पहात असतो.  मात्र यंदा अतिशय सध्या पद्धतीने साजरा होणारा गणपती बाप्पाचा महोत्सव कलाकार मंडळींच्या घरी देखील असाच साजरा झाला आहे. प्लॅनेट मराठीचे सर्वेसर्वा आणि निर्माते अक्षय बर्दापूरकर यांच्या मुलुंड येथील राहत्या घरी बाप्पा देखील अशाच छोटेखानी साजात विराजमान झाला आहे.अक्षय यांच्या घरी गेली चौदा वर्ष नित्य नियमाने बाप्पाचे आगमन होत आहे.कलेची  देवता असलेल्या आपल्या लाडका गणरायासोबत जास्तीत जास्त वेळ घालवायला मिळतो याचा आनंद असला तरीही जगावर आलेलं कोरोनाचं संकट लवकर नष्ट होऊ देत हेच मागणं अक्षय बर्दापूरकर यांनी बाप्पाकडे मागितलं आहे. 
व्यवसाय वाढवायचाय? मग डिजिटल मार्केटिंग केलंच पाहिजे. याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी या लिंकवर क्लिक करा:


https://www.creativekhopadi.com/services

26 views0 comments