शिवरायांचे मावळे शोभले ! बघा यांनी काय केले..!
Updated: Aug 21, 2020
आज कित्येक वर्षा नंतर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार तरुणांना प्रभावित करतात आणि आजही महाराष्ट्रातील रयतेचे शिवरायांवरील वरील प्रेम तिळमात्रही कमी झालेलं नाही.

आज संपूर्ण देश लॉक डाउन आहे प्रत्येक जण घरामध्ये बंद आहे. कारण आहे बाहेर फिरणारा शत्रू कोरोना.कामधंदे बंद आहेत घरात बसून काय करायचे असा प्रश्न बऱ्याच लोकांना पडतो. बरेच जण अनेक अनेक गोष्टी करताना दिसतात कोणी गेम्स खेळण्यात वेळ घालवतोय तर कोणी चित्रपट आणि सिरीज बघण्यात पण उस्मानाबाद च्या तरुणांनी जे केलं ते प्रशंसनीय होत.
उस्मानाबाद च्या अभयसिंह अडसूळ यांच्या कल्पनेतून आगामी येणाऱ्या सरसेनापती हंबीरराव या चित्रपाटाचे पोस्टर आपल्या मित्र मंडळींना सोबत घेऊन गहू लावून शेतात बनविले.
याबद्दल सांगताना अभयसिंह म्हणतात
"लॉकडाऊन मध्ये काय करायचं वेळ कसा काढायचा यात सुचलेली संकल्पना, हिंदवी स्वराज्यचा इतिहास रुपेरी पडद्यावर यावा हे लहानपणापासून ची इच्छा होती, आपल्या मावळयावर चित्रपट असावेत अनेकदा वाटायचे, त्याला आता सुरवात झाली तान्हाजी या हिंदी चित्रपटाने. आगामी काळात हंबीरराव मोहिते यांच्यावर ही चित्रपट येत आहे आपण काही तरी केलं पाहिजे म्हणून लॉकडाउन च्या काळात सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या वर येत असलेल्या चित्रपट चे पोस्टर शेतात गहू लाऊन तयार केलं हे पोस्टर 90 बाय 45 फूट आहे ही कलाकृती गाव ईटकूर ता कळंब जी उस्मानाबाद येथे साकारली आहे कलाकृती कुंडलिक राक्षे ( जिल्हा परिषद शिक्षक ) यांनी तयार केली."

याबद्दल बोलताना सरसेनापती हंबीरराव चे निर्माते मात्र भावुक झाले चित्रपटावरील तरुणांचे प्रेम पाहून आमच्याकडे बोलायला शब्दच उरले नाहीत अश्या स्वरूपाची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

दरम्यान सध्या सर्व चित्रपट सृष्टी ठप्प आहे सरसेनापती हंबीरराव हा चित्रपट जून मध्ये प्रदर्शित होणार होता. आता तो ऑनलाईन रिलीज होतो की थिएटर पुन्हा सुरू होण्याची निर्माते वाट पाहतात हे पाहूया.
व्यवसाय वाढवायचाय? मग डिजिटल मार्केटिंग केलंच पाहिजे. याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी या लिंकवर क्लिक करा:
https://www.creativekhopadi.com/services