top of page
Search

'बिनोद' मिल गया????

Updated: Aug 21, 2020


जगात अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्यांचे रहस्य मानवजातीला अजूनही उलगडले नाही. जसे की, मोनालिसाचे हास्य, विश्वाची निर्मिती कशी झाली आणि बरंच काही!

याच रहस्यांत आता अजून एका रहस्याची भर पडली आहे. हे रहस्य म्हणजे " बिनोद कोण आहे? "

तुम्हीही या बिनोदबद्दल सोशल मीडियाला भरपूर वाचलं असेल. मिम्स वाचले असतील. काही जणांनी तर ते शेअरसुद्धा केले असतील. पण बरेच जण या ट्रेंडपासून अनभिज्ञ असतील. चला तर मग जाणून घेऊयात हा बिनोद कुठून आणि कसा आला?



गौतमी आणि अभ्युदय नावाचे यूट्यूबर्स गेल्या आठवड्यात आपल्या स्लॅवी पॉईंट या यूट्यूब चॅनेलवरील व्हिडिओजला लोकांनी दिलेल्या कॉमेंटस पाहत होते. त्यावेळी त्यांना एक लक्षात आले की बिनोद थारु नावाचा एक व्यक्ती प्रत्येक व्हिडिओला आपल्या नावाचीच कॉमेंट देत होता.


कोणत्याही विषयावरील व्हिडिओ असला तरी त्याची कॉमेंट 'बिनोद' इतकीच दिसत होती. बिनोदचा हा विनोद या यूट्यूबर्सना इतका आवडला की त्यांनी बिनोद कॉमेंटला डेडीकेट करीत 'व्हाय इंडियन कॉमेंट्स सेक्शन इज गार्बेज' हा व्हिडिओच अपलोड करुन टाकला. त्यानंतर हा व्हिडिओ आणि बिनोद काही तासांतच देशभर व्हायरल झाला.

प्रत्येक सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर बिनोद धुमाकूळ घालू लागला. हजारो मीम्स तयार होऊ लागले. लोक कोणत्याही पोस्ट किंवा व्हिडिओला बिनोद इतकेच कॉमेंटू लागले. बघता बघता करोडो सोशल मिडिया यूजर्स बिनोदला फॉलो करु लागले. अनेक कॉर्पोरेट्सनाही बिनोदचा आनंद लुटण्याचा मोह आवरला नाही.




ई कॉमर्स जायंट पेएटीएमनेही आपल्या एका फॉलोअरच्या इच्छेखातर ट्विटर हँडलचे नाव बदलून बिनोद ठेवले आहे. हा बिनोद देशभर चर्चेचा विषय झाल्यामुळे आता न्यूज चॅनेल्सनीही त्याचा जन्मदाता बिनोद थारुचा शोध घेण्यास आणि त्याला सेलिब्रिटी बनवण्याची मोहिम हाती घेतली आहे.


या बिनोदने सोशल मीडियावर घातलेला धुमाकूळ पाहता लोक त्याची उत्सुकतेने वाट पाहात आहेत एवढं मात्र नक्की!



व्यवसाय वाढवायचाय? मग डिजिटल मार्केटिंग केलंच पाहिजे. याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी या लिंकवर क्लिक करा:


https://www.creativekhopadi.com/services

15 views0 comments
bottom of page