top of page
Search

बिग बॉसचं काय चाललंय?

छोट्या पडद्यावरील सर्वाधिक चर्चेत असणारा बिग बॉस या शोचं नवीन पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रत्येक पर्वाप्रमाणेच या पर्वाचे सूत्रसंचालनही अभिनेता सलमान खान करणार आहे. त्यामुळे या शोविषयी प्रेक्षकांमध्ये असलेली उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.यंदाच्या पर्वामध्ये अनेक बदल करण्यात आले असून या शोच्या सेटवरील 'बिहाइंड द सीन'चा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.कलर्स टीव्हीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन बिग बॉस १४ च्या सेटवरील एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये अभिनेता सलमान खान त्याच्या खास अंदाजात सूत्रसंचालन करताना दिसत आहे. तसंच सेटवरील कामाची लगबगदेखील दिसून येत आहे.या शोमध्ये कोणते कलाकार सहभागी असतील याबद्दल सध्या कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. बिग बॉसचे चाहते या सिझनची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
व्यवसाय वाढवायचाय? मग डिजिटल मार्केटिंग केलंच पाहिजे. याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी या लिंकवर क्लिक करा:


https://www.creativekhopadi.com/services

22 views0 comments
bottom of page