top of page
Search

बिग बुलची धडक लवकरच...!

Updated: Aug 21, 2020

कोरोनाच्या संकटामुळे अनेक चित्रपट सध्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर प्रदर्शित होत आहेत. गुलाबो सिताबो, शकुंतला देवी, दिल बेचारा, गुंजन सक्सेना अशा अनेक हिट चित्रपटानंतर अजून एक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट म्हणजे बिग बुल.
अजय देवगण आणि आनंद पंडित यांची निर्मिती असलेला 'बिग बुल' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. अजय देवगण याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करत याविषयी माहिती दिली आहे.अभिनेत्री अलिआना डीक्रूझ ही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील तिचा फर्स्ट लुक प्रसिद्ध करण्यात आला आहे. कुकी गुलाटी यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात अभिषेक बच्चनही दिसणार आहे.या चित्रपटाचा ट्रेलर मागच्या महिन्यात प्रदर्शित करण्यात आला आहे. २३ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट डिस्नी हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. अजय देवगण फिल्म्सची ही निर्मिती आहे. कुमार पाठक, विक्रांत शर्मा, मीना अय्यर हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.व्यवसाय वाढवायचाय? मग डिजिटल मार्केटिंग केलंच पाहिजे. याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी या लिंकवर क्लिक करा:


https://www.creativekhopadi.com/services

21 views0 comments
bottom of page