अमिर चिकनने दिल्या रोजगाराच्या अनेक संधी
अनेक लोकांचे रोजगार जाण्याच्या काळात अमिर चिकन या चिकन विक्रेत्या ब्रँडने मात्र २०० पेक्षा जास्त लोकांना रोजगार उपलब्ध करून दिले आहेत. यापुढील काळातही जास्तीत जास्त रोजगार देण्यावर त्यांचा भर राहणार आहे.
कोरोना आणि त्यामुळे लागलेल्या लॉकडाऊनमुळे हजारो लोकांचे रोजगार गेले. अनेकांना अगदी कमी पैश्यात काम करावं लागत आहे. कोरोनामुळे काही व्यवसायांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अशा मंदीच्या काळातही अमिर चिकन या पुण्यातील नामवंत चिकन विक्रेत्या ब्रॅन्डने तब्बल २५० लोकांना रोजगार उपलब्ध करून दिले आहेत. यापुढील काळात अमिर चिकन १०,००० हुन अधिक लोकांना रोजगार मिळवून देणार असल्याचे या कंपनीचे सर्वेसर्वा विजय मोरे यांनी सांगितले.
आपल्या शाखा गावोगावी तसेच खेड्यातही सुरु करून तेथील स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देणे हे अमिर चिकनचे उद्दिष्ट आहे, असेही ते म्हणाले. यासाठी शिक्षणाची अट नाही. शिक्षित, अल्पशिक्षित तरुणांनाही रोजगार मिळणार असल्याचे मोरे यांनी सांगितले. अमिर चिकनच्या माध्यमातून स्वच्छ आणि दर्जेदार चिकन नागरिकांपर्यंत पोहोचत आहे. होतकरू आणि गरजू तरुणांना केवळ शिक्षणाच्या आधारावर रोजगार नाकारला जाऊ नये यासाठी अमिर चिकन प्रयत्नशील आहे. तसेच गावोगावी, खेडोपाडी दर्जेदार चिकन पुरवण्याचे अमिर चिकनचे उद्दिष्ट आहे.
१९९१ पासून अमिर चिकन स्वच्छ आणि दर्जेदार चिकन पुरवठा करत आहे. स्वच्छ परिसर, प्रशिक्षित कामगारवृंद, नियोजनबद्ध सेवा आणि ग्राहकहित जपणारे म्हणून अमिर चिकनचा लौकिक आहे. चिकनसोबतच अंडी पुरवठा करणारा अमिर चिकन हा ब्रॅन्ड आहे. संपूर्ण पुण्यात अमिर चिकनच्या जवळपास ६०० शाखा आहेत. तसेच अनेक नवीन शाखासुद्धा ठिकठिकाणी सुरु होत आहेत. अमिर चिकन फ्रॅन्चायझीसुद्धा देत आहे. यातून अनेक युवकांना स्वतःचा व्यवसाय सुरु करणे शक्य झाले आहे. अमिर चिकन आपल्या उत्पन्नातील काही हिस्सा म्हणजे प्रति किलोमागे एक रुपया शेतकरी आणि सैनिकांच्या परिवारासाठी देत आहे. अशा रीतीने अमिर चिकन व्यवसायासोबतच सामाजिक भानही राखून आहे.