आजचे डूडल जोहरा सेहगल यांना समर्पित!
गूगलचे डूडल्स कायमच सर्वांच्या चर्चेचा विषय ठरतात. नाविन्यपूर्ण डिझाइन्स, वेगवेगळे जागतिक विषय ही त्याची काही वैशिष्ट्ये. आजचे गूगलचे डूडल हे अभिनेत्री, नर्तिका, नृत्यदिग्दर्शिका जोहरा सेहगल यांना समर्पित केले आहे. कोण होत्या जोहरा सेहगल? चला जाणून घेऊया!
जोहरा मुमताज सेहगल ह्या एक भारतीय अभिनेत्री, नर्तक आणि कोरिओग्राफर होत्या. उदय शंकरच्या संचात नृत्यांगना म्हणून सेहगलने आपल्या करिअरची सुरूवात केली, आणि अमेरिका आणि जपानसारख्या देशांमध्ये कार्यक्रम सादर केले. करिअरच्या ६० वर्षांहून अधिक काळात अभिनेत्री म्हणून त्या बॉलिवूडच्या असंख्य चित्रपटांमध्ये दिसल्या.
त्यांनी ज्या प्रसिद्ध चित्रपटांमध्ये भाग घेतला त्यामध्ये नीचा नगर, अफसर , भाजी ऑन द बीच , दिल से .. , द मिस्टिक मस्सुर, साया , सावरिया आणि चीनी कम; आणि टीव्ही मालिका द ज्वेल इन द क्राउन , तंदुरी नाईट्स आणि अम्मा आणि फॅमिली हे काही मुख्य चित्रपट. वयाच्या ९०व्या वर्षी त्यांनी २००२ मध्ये 'चलो इश्क लडाये' या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका केली होती.

भारतीय रंगमंचात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन (आयपीटीए) आणि पृथ्वीराज कपूर यांच्या पृथ्वी थिएटरमध्ये १४ वर्षे काम केले. त्यांनी बेंड इट लाईक बेकहॅम सारख्या इंग्रजी भाषेतल्या चित्रपटातही काम केले आहे. त्यांना १९६३ मध्ये संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार, १९९८ मध्ये पद्मश्री, २००१ मध्ये कालिदास सन्मान मिळाले. २००४ मध्ये संगीत नाटक अकादमी, जी भारतीय संगीत, नृत्य आणि नाट्य कलेतील राष्ट्रीय अकादमी आहे, त्याच्या आजीवन कर्तृत्वासाठीच्या संगीत नाटक अकादमी फेलोशिप ह्या सर्वोच्च पुरस्काराने त्यांना सन्मानित केले गेले. २०१० मध्ये भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषण प्रदान करण्यात आला.