जेंव्हा शिवाजी महाराज म्हणतात "अरे मी सांगतोय तोफा वाजवा"

लहानपणी ४ थी च्या पुस्तकात धडा होता "पावनखिंड" नावाचा त्यात बाजीप्रभू देशपांडे कोण होते त्यांनी काय केले हे पहिल्यांदा कळले. हा धडा राजे गडावर पोहोचले आणि तोफा कडाडल्या इथेच संपतो पण लहानपानपासून त्यापुढे काय झाले हा एक प्रश्न मनात कायम राहिला. ज्या समर्पण वृत्तीने बाजीप्रभू म्हणाले होते कि "राजे तुम्ही गडावर पोहोचल्यावर तोफा वाजवा तो वर मी गनीम इथंच अडवून धरतो" मग राजे जेंव्हा गडावर पोहोचले असतील तेंव्हा त्यांनी नेमकं काय केलं असेल काय अवस्थेत आणि काय मनस्थिती मध्ये ते असतील आणि या प्रश्नाचे उत्तर आज इतक्या वर्षांनंतर "दिगपाल लांजेकर" यांनी सिनेमा च्या माध्यमातून दिलं आहे.पावनखिंड ते विशाळगड या प्रवासात राजेंच्या मनात एकाच गोष्ट असते ती म्हणजे मला विशाळगडावर पोहचून तोफा वाजवायच्या आहेत. आणि विशाळगडावर पोहोचल्या वर ते आपल्या सहकार्यांवर चिडतात आणि म्हणतात "अरे मी काय सांगतोय तोफा वाजवा" यातून राजेंची आपल्या मावळ्यांची असणारी तळमळ स्पष्ट दिसते आणि ती तळमळ तंतोतंत आपल्या अभिनयातून "चिन्मय मांडलेकर" मांडण्यात यशस्वी झाले आहेत.
सिनेमा ची गोष्ट आपल्या कोणासाठीच नवीन नाहीये पण ती सिनेमा च्या रूपात मांडण्यात दिगदर्शक आणि टीम यशस्वी झाले आहेत. गोष्ट जरी नवीन नसली तरी गोष्टीतले बारकावे आणि आपल्याला माहित नसलेल्या इतर बऱ्याच गोष्टी या मध्ये आपल्याला माहित होतात. पन्हाळगडाला जेंव्हा वेढा पडतो तेंव्हा महाराज आणि शिलेदार गडावर उभे राहून पाहणी करत असतात त्याच वेळेला एक तोफ गोळा येऊन गडावर आदळतो त्या क्षणाला तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही एवढं खरंय. नेहमी प्रमाणेच या मोहिमेत देखील "बहिर्जी नाईक" महत्वाची भूमिका पार पडतात. हरीश दुधाडे यांनी ती भूमिका अतिशय उत्तम प्रकारे पार पडली आहे. अश्याच एका सिनेमाच्या प्रसंगामध्ये महाराजांचा बहिर्जी नाईक यांच्या वर किती विश्वास होता ते पाहायला मिळते आणि आपोआपाच आपल्या तोंडून वाह असे उद्गार बाहेर पडतात.

फर्जंद आणि फत्तेशिकस्त पेक्षा यावेळी मात्र दिगदर्शकाने थोडी जास्त सिनेमॅटिक लिबर्टी घेतली आहे आणि ती घ्यायलाच हवी,त्यामुळे पहिल्या दोन सिनेमापेक्षा पावनखिंड नक्कीच सिनेमा म्हणून वरचढ ठरला आहे. मी आधी सांगितल्या प्रमाणे तो तोफ गोळ्याचा प्रसंग,त्यांनतर बाजीप्रभू जेंव्हा गनिमाला "चल" असे म्हणतात तो प्रसंग त्यांनतर "शिवा" ने सिद्धी जोहर ला उद्देशून म्हणलेले सर्व संवाद, अरे बापरे असे किती प्रसंग सांगू कि ज्यावेळी आपण टाळ्या शिट्या आणि ओरडल्या शिवाय राहू शकत नाही.
सिनेमा एकूण १५३० शो घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांच मिळणारे प्रेम पाहता पहिल्या आठवड्यात सिनेमा ५० टक्के च्या क्षमतेने अंदाजे १८ ते २२ कोटी चे बॉक्स ऑफिस कलेक्शन करेल. जे कि रेकॉर्ड ब्रेकिंग असू शकते.
सिनेमा तुमच्या जवळच्या सिनेमागृहात रिलीज झाला आहे आजच बघून या !
https://in.bookmyshow.com/movies/pawankhind/ET00307433
Mayursingh
Co-Founder
Creative Khopadi Pune.